पाळीव कुत्र्यांना घराबाहेर फिरवा अन्यथा २ लाख दंड भरा


ऑस्टेलियाची राजधानी कॅनबेरा येथे सरकारने नवीन कायदा लागू केला आहे. या नव्या कायद्यानुसार ज्यांनी घरात कुत्री पाळली आहेत त्यांनी दिवसातून एकदा दोन तास या कुत्राना घराबाहेर फिरायला नेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे कुत्रेमालक हा नियम मोडतील त्यांना २७०० अमेरिकन डॉलर्स म्हणजे १ लाख ९२ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

यासाठी सरकारने अॅनिमल वेल्फेअर लेजिस्लेशन कायद्यात सुधारणा करून गुरुवारी हा नवा कायदा लागू केल्याचे समजते. यामुळे प्राणी पाळणाऱ्यांना खुपच दक्षता घ्यावी लागेल. मालकाने या पाळीव प्राण्यांना वेळच्यावेळी खायला प्यायला देणे, त्याच्या निवाऱ्याची चांगली व्यवस्था ठेवणे बंधनकारक केले गेले आहे. यात त्रुटी आढळल्या तर मालकाला जागेवरच दंड होणार आहे. तसेच जी कुत्री चोवीस तास घरातच राहतात त्याना दिवसातून किमान दोन तास फ्री सोडावे लागेल. कुत्र्याप्रमाणेच मांजरासाठी सुद्धा हाच नियम केल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment