…अन्यथा तेलाचे भाव खूप वाढतील – सौदी प्रिंस

इराणबरोबर सुरू असलेल्या वादानंतर सोदी अरेबियाचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांनी म्हटले आहे की, जर इराणला रोखण्यासाठी इतर देश सोबत आले नाहीत, तर  तेलाचे भाव विचारही केला नाही एवढे वाढतील. याच महिन्याच्या सुरूवातीला सौदीमधील दोन तेल रिफायनऱ्यांवर झालेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यानंतर प्रिंस सलमान यांनी पहिल्यांदाच या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिंस सलमान यांनी म्हटले आहे की, जगभरातील देशांनी इराणच्या विरोधातील कारवाईमध्ये सहभागी व्हायला हवे. नाहीतर यामुळे सर्वांचे नुकसान होईल. तेल रिफायनऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी यमनच्या हुती विद्रोही गटाने घेतली होती. तर सौदी अरबने इराणला यासाठी जबाबदार धरले होते. तर अमेरिकेने देखील यासाठी इराणला जबाबदार धरले होते.

अमेरिकेने इराणवर लावलेल्या प्रतिबंधात वाढ केली आहे. अमेरिकेने इराणच्या केंद्रीय बँका आणि एका डेव्हलपमेंट फंडला प्रतिबंध कक्षेत घेतले आहे.

प्रिंस सलमान म्हणाले की, आम्हाला इराणबरोबर युध्द नको, राजकीय समाधान हवे आहे. युध्दामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. इराणमुळे तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल आणि तेलाचे भाव एवढे वाढतील की, जेवढे आपण आपल्या आयुष्यात बघिलते नसतील.

याशिवाय वर्षभरापुर्वी जमाल खशोगीची हत्या ही आमची चुक होती. देशाचा प्रमुख म्हणून मी त्याची जबाबदारी स्विकारतो. मात्र या हत्येचे आदेश मी दिले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केेले.

 

Leave a Comment