… म्हणून मी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा तिरस्कार करतो – श्रीसंत

भारतीय संघाचा माजी जलद गोलंदाज एस श्रीसंत आणि वाद हे एकमेकांशी नेहमीच एकमेंकासोबत राहिलेले आहेत. आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झालेला श्रीसंत आता पुन्हा एकदा चर्चा विषय ठरत आहे. यावेळी त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक पंसत केला जाणारा संघ चेन्नई सुपर किंग्सबद्दल वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचे चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने राजस्थान रॉयल्सचे माजी कोच पॅडी अपटनच्या आरोपांना उत्तर दिले. श्रींसतने सांगितले की, मी अपटन यांना अनेकदा सांगितले की, मला चेन्नईच्या विरूध्द मॅच खेळू द्या. कारण मला त्यांना हरवायचे होते. मात्र अपटन यांनी मला चेन्नईविरूध्द मॅच फिक्सिंगसाठी खेळायचे होते, असे स्वरूप दिले. सर्वांना माहिती आहे की, चेन्नई सुपर किंग्स मला आवडत नाही. लोक असे म्हणू शकतात की, धोनी आणि श्रीनिवासन यांच्यामुळे आवडत नाही. मात्र तसे नाहीये. मला पिवळा रंग आवडत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया देखील मला आवडत नाही.

काही दिवसांपुर्वीच पॅडी अपटनने आपल्या पुस्तकात दावा केला होता की, श्रीसंतने त्यांना आणि राहुल द्रविडला शिव्या दिल्या होत्या. यावर श्रीसंतने अपटन यांचे दावे खोटे असल्याचे म्हटले आहे.

श्रीसंतने मुलाखतीमध्ये जेलमध्ये त्याच्याबरोबर झालेल्या घटनांबद्दल देखील सांगितले. मी जेलमध्ये नेहमी विचार करायचो की, हे सर्व कसे काय घडले.

श्रीसंतने पुढे सांगितले की, अनेकवेळा आत्महत्येचा विचार देखील मनात आला. 4 ते 5 वेळा असा अनुभव आला की, आयुष्य संपवावे वाटले. श्रीसंतचा बॅन सात वर्ष करण्यात आलेला असून, सात वर्षानंतर तो क्रिकेट खेळू शकतो.

 

Leave a Comment