अवघ्या 20 मिनिटात या ‘स्पायडर मॅन’ने केली 42 मजली इमारतीवर चढाई

फ्रांसचे ‘स्पायडर मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेले एलिन रॉबर्टला 502 फूट उंच स्काईपर टॉवरवर चढल्यामुळे जर्मनीच्या पोलिसांनी अटक केले आहे. 42 मजली ही इमारत जर्मनीच्या आर्थिक राजधनाची केंद्र आहे. 57 वर्षीय रोबर्टने या इमारतीवर चढण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली नाही की, कोणत्याही सुरक्षेच्या साधनांचा वापर केला नाही. ग्लास स्ट्र्क्चर असणाऱ्या या इमारतीवर रॉबर्ट 20 मिनिटे चढत होता. त्यांच्या या कारनाम्याचा तेथील लोकांनी व्हिडीओ देखील बनवला. पोलिसांच्या सांगण्यावरून रॉबर्ट खाली येताच, स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासाठी पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र इमारतीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

रॉबर्टने या आधी देखील जगातील अनेक बहुमजली इमारती कोणाचीही परवानगी न घेता चढल्या आहेत. ऑक्टोंबर 2018 मध्ये त्याला लंडनमधील सर्वात मोठ्या 662 फूट उंच सेल्सफोर्स टॉवरवर चढल्याने अटक करण्यात आली होती. तेव्हाही त्याने दोरी अथवा कोणत्याही दुसऱ्या सुरक्षेच्या साधनांचा वापर केला नव्हता.
https://youtu.be/FZv8fTR4pJY
फ्री क्लाइंबर रॉबर्टने जगातील सर्वात उंच इमारत दुबईच्या बुर्ज खलिफा (2716 फुट) वर देखील चढाई केलेली आहे. याचबरोबर तायवानमधील 331 फूट उंच ताइपे टॉवर आणि लंडनमधील लॉयड्स बिल्डिंग, न्युयॉर्कचे एम्पायर स्टेट्स आणि फ्रांसमधील आयफेल टॉवरवर देखील चढाई केली आहे. फ्री क्लाइंबिंगमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या साधनांचा वापर करण्यात येत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा देखील धोका असतो.

 

Leave a Comment