पी चिदंबरम यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चिदंबरम साक्षीदारांवर प्रभाव पाडू शकतात, असे म्हणत न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला आहे. सीबीआयने चिदंबरम यांना जामीन देण्यास विरोध केला होता.  चिंदबरम हे मागील एक महिन्यापासून तिहार कारागृहात आहेत.

चिदंबरम यांना 21 ऑगस्टला सीबीआयने अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने आयएनएक्स मीडिया प्रमोटर इंद्राणी मुखर्जीच्या साक्षीच्या आधारावर चिदंबरम यांना अटक केली होती.

2007 मध्ये चिदंबरम अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियामध्ये एफआयपीबी मंजुरी मिळवून देण्यासाठी अनियमितता दाखवली होती. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमवर देखील लाच घेतल्याचा आरोप आहे.

 

Leave a Comment