केवळ 199 रूपयांमध्ये खरेदी करू शकता हा स्मार्टफोन

भारतात फेस्टिवल सीझनची सुरूवात झाली आहे. यानिमित्ताने ई-कॉमर्स साईट्स देखील अनेक प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स देत आहेत. काही दिवसांपुर्वीच लाँच झालेला मोटो ई6एस ग्राहक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून केवळ 199 रूपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची खरी किंमत 7,999 रूपये आहे.

(Source)

मोटोरोला ई6एस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या व्हेरिएंटची किंमत 7,999 रूपये आहे. ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलच्या दरम्यान हा फोन 199 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. मोटोरोलाच्या ग्राहकांना या फोनच्या खरेदीवर 7,800 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. मात्र एक्सचेंज ऑफरची किंमत ही तुमच्या जुन्या फोनवर निर्भर आहे. ग्राहकांना फ्लिपकार्टच्या सेल्समध्ये एक्सिस बँकच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक देखील मिळत आहे.

(Source)

या स्मार्टफोन ई6एसमध्ये अँड्राइड पाय 9 ओएस आहे. यामध्ये 6.1 इंच डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. यामध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी22 एसओसी प्रोसेसर आहे.

यामध्ये दोन रियर कॅमेरे देण्यात आले असून, यातील 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ 5.0, जीपीएस, वाय-फाय आणि युएसबी पोर्ट सारखे फिचर्स देण्यात आला आहे. यामध्ये 3000 एमएएचची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment