मारूती सुझुकीची बहुप्रतिक्षित एस-प्रेसो बाजारात दाखल

मारुती सुझुकीने बहुप्रतिक्षित ‘एस-प्रेसो’ कार भारतात लाँच केली आहे. या कारची सुरूवातीची किंमत 3.69 लाख रूपये आहे. केवळ पेट्रोल इंजिनमध्येच ही कार बाजारात आणण्यात आली असून, Standard, LXI, VXI, and VXI+ या चार व्हेरिएंट्समध्ये कार लाँच करण्यात आलेली आहे. कारमध्ये 10 पेक्षा अधिक सेफ्टी फिचर्स देण्यात आलेले आहेत.

(Source)

मारूती एस-प्रेसोचे समोरील बाजू बोल्ड दिसते. यामध्ये बोनट लाइन, क्रोम ग्रिल आणि मोठे हॅलोजन हेडलॅम्प देण्यात आले आहेत. एलईडी डीआरएल हेडलाइट खाली देण्यात आली असून, फ्रंट आणि रिअर बंपर अतिशय मजबूत आहे. ही एसयुव्ही 6 रंगामध्ये उपलब्ध आहे.

(Source)

या एसयुव्हीच्या कॅबिनचा रंग काळा आहे. डॅशबोर्डच्या खाली डिजिटल स्पीडोमीटर आणि टेकोमीटर देण्यात आला आहे. त्याचा खाली स्मार्टप्ले स्टूडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. स्पीडोमीटर कंसोल आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम एका सर्क्युलर आउटलाइनच्या आत असून, ते मिनी कूपर कार प्रमाणे दिसते. सेंट्रल एसी वेंट्स सर्क्युलर हे आउटलाइनच्या दोन्ही बाजूंना देण्यात आले आहे.

(Source)

मारूती सुझुकीने एस प्रेसोमध्ये सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. यामध्ये 10 सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये एयरबॅग्स, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टमचे एबीएस, रिअर पार्किंग सेंसर्स आणि सीट बेल्ट रिमाइंडर सारखे खास फिचर्स आहेत. टॉप व्हर्जनमध्ये ड्युल फ्रंट एअरबँग्स मिळतील.

(Source)

इंजिनबद्दल सांगायाचे तर 1.0 लिटरचे नवीन BS6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे  68PS पॉवर आणि 90NM चा टॉर्क देते.  यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड AGS (ऑटो गिअर शिफ्ट) देण्यात आले आहे. एक लिटरमध्ये ही कार 21.7 किलोमीटर मायलेज देते.

(Source)

किंमतीबद्दल सांगायचे तर एस प्रेसो Standard ची किंमत 3.69 लाख रूपये, एस प्रेसो LXI 4.05 लाख रूपये, एस प्रेसो VXI व्हेरिएंटची किंमत 4,24,500 रूपये आणि एस प्रेसो VXI+ व्हेरिएंटची किंमत 4.48 लाख रूपये आहे.

 

Leave a Comment