लालू प्रसादांच्या सूनेचा सासू-नणंदेवर मानसिक छळ केल्याचा आरोप


पाटणा – पुन्हा एकदा चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब चर्चेत आले आहे. सासू आणि नणंदेवर तेज प्रताप यांची पत्नी ऐश्वर्या यादव यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.

रविवारी राबडी देवी यांच्या निवासस्थानी हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. ऐश्वर्या यांना राबडी देवी यांनी घराच्या बाहेर काढले होते. ऐश्वर्यासह तिचे वडील चंद्रिका रॉय आणि आई प्रमिला त्यानंतर घरात प्रवेश मिळावा म्हणून घराच्या गेटबाहेर उपस्थित होते. राबडी देवी यांच्याशी पोलिसांनी बोलणी केल्यानंतर रात्री १ वाजता ऐश्वर्या यांना घरात प्रवेश मिळाला आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवीवर ऐश्वर्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. आमचे पती-पत्नीचे नाते तोडण्याचा प्रयत्न राबडी देवी आणि माझी मोठी नणंद करत आहे. येथे मला जून महिन्यापासून जेवण दिले जात नसून माझ्या वडिलांच्या घरून मला जेवण येत असल्याचे असे ऐश्वर्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

तेज प्रताप याचा मे २०१८ मध्ये बिहारचे माजी वाहतूक मंत्री चंद्रिका राय यांची मोठी मुलगी ऐश्वर्याबरोबर विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. तेजप्रताप यांनी नोंव्हेबर २०१८ मध्ये घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जो पर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत ऐश्वर्या आपल्या सासरी राहतील असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Comment