अहो, संभाजी भिडे बुद्ध समजायला बुद्धी लागते – जितेंद्र आव्हाड


मुंबई – भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर माध्यमातून त्यांच्या विरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. अहो, बुद्ध समजायला संभाजी भिडे बुद्धी लागते, असे ट्विट करत आव्हाड यांनी भिडेंवर टीका केली.

जगाला भारताने बुद्ध दिला, पण बुद्धाचा काही उपयोग नसल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर त्यांचा समाचार घेतला. बुद्ध समजायला बुद्धी लागते, कोणालाही बुद्ध समजत नसल्याचे म्हणत आव्हाड यांनी भिडेंना लक्ष्य केले.

Leave a Comment