सोशल मीडियावरील फोटोसाठी ही कंपनी देते भाडोत्री मित्र-मैत्रिणी

सोशल मीडियाचा वापर आज प्रत्येक जण करत आहे. मात्र सोशल मीडियावरील फोटोसाठी कोणी भाड्याने मित्र-मैत्रिणी देते, असे कधी ऐकले आहे का ? नाही ना. मात्र जापानमधील रिअल अपील कंपनी सोशल मीडिया फोटोसाठी भाड्याने मित्र देते. यासाठी ग्राहकाला रिअल अपीलच्या वेबसाइटवर जाऊन कॅटलॉगमधून आपल्यासाठी काही मित्र-मैत्रिणी निवडाव्या लागतात. हे फेक फ्रेंड्स कंपनीचेच कर्मचारी असतात.

(Source)

ग्राहकाने एखाद्या मित्र-मैत्रिणीची निवड केल्यानंतर, तो त्याच्याबरोबर सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी फोटो काढण्यास तयार होतो. कंपनीची सर्विस दोन तासांसाठी उपलब्ध असते. यासाठी ग्राहकाला 8 हजार येन म्हणजेच पाच हजार रूपये द्यावे लागतात.

कंपनीच्या मित्रांबरोबर काढलेला फोटो फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, प्रोफाइल पिक्चर या ठिकाणी अपलोड करू शकतो. ग्राहक हवे तेवढे मित्र-मैत्रिणी निवडू शकतात, मात्र या सर्विसवर कोणत्याही प्रकारचे डिस्काउंट दिले जात नाही. ग्राहकालाच निवड केलेल्या मित्र-मैत्रिणींच्या जाण्या-येण्याचा, खाण्याचा खर्च करावा लागतो.

(Source)

कंपनीच्या या पेमेंटमुळे ही सर्विस घेणे अवघड आहे. रिअल अपील कंपनी ही फॅमेली रोमांस कंपनीचीच सहयोगी कंपनी आहे. फॅमिली रोमांस ही कंपनी भाड्याने खोटे नातेवाईक पुरवते. ही सर्विस महागडी असली तरी देखील जापानमधील काही लोकांना ही सर्विस आवडत आहे.

 

Leave a Comment