बांग्लादेशला नमवत भारताने अंडर-18 सैफ कप स्पर्धेत रचला इतिहास

भारताच्या अंडर-18 पुरूष फुटबॉल संघाने सैफ कप स्पर्धेत बांग्लादेशचा पराभव करत किताबवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने फायनलमध्ये बांग्लादेशचा 2-1 असा पराभव केला. फुल टाइममध्ये स्कोर 1-1 असा बरोबरीत होता. इंज्युरी टाइम (90+1) मध्ये रवी राणाने गोल करत संघाला विजय मिळवून दिला. तर तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत मालदीवने भूतानला 1-0 ने हरवले.

फायनलमध्ये भारताने चांगली सुरूवात केली. दुसऱ्याच मिनिटाला ब्रिकम प्रताप सिंहने गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 30 व्या मिनिटाला बांग्लादेशच्या यासिन अराफातने गोल करत स्कोर 1-1 असा बरोबर केला. हाफ टाइमपर्यंत हा स्कोर बरोबरीतच होता. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने जिंकले.

 

Leave a Comment