सई ताम्हणकरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज


आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरने भूमिका साकारल्या आहेत. तिने तिच्या दमदार अभिनयाची झलक हिंदी सिनेसृष्टीतही दाखवून दिली आहे. ती अलिकडेच अमेय वाघसोबत ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटात झळकली होती. ती आता पुन्हा एकदा एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

लवकरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. सईची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. तिचा या चित्रपटात असलेला फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.


सई ताम्हणकरसोबत या चित्रपटात राजेश श्रृंगारपूरे आणि निखिल रत्नपारखी हे देखील भूमिका साकारत आहेत. स्मिता प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती विनय गनू हे करत आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment