क्रिकेट स्टेडियममध्ये धोनी खेळत आहे बिलियर्डस


टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप नंतर क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मात्र त्याचे या सुटीच्या काळात चाललेल्या उद्योगांचे फोटो वेळोवेळी सोशल मिडियावर शेअर होत आहेत. नुकताच धोनीचा बिलियर्ड्स खेळतानाचा एक फोटो झारखंडच्या बहारगोडाचे आमदार कुणाल सारंगी यांनी शेअर केला आहे. झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये काही मित्रांसोबत माही बिलियर्ड्स खेळताना त्यात दिसत आहे. यावेळी माही अगदी रीलॅक्स मूड मध्ये आहे. यापूर्वी वर्ल्ड कप नंतर लष्करांत चाकरी करताना तसेच अमेरिकेत गोल्फ खेळताना, गल्लीत क्रिकेट खेळताना आणि नवीन खरेदी केलेल्या जीप चीरोकीमधून धोनी फेरफटका मारत असतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.

क्रिकेटमधून धोनी संन्यास घेणार काय हा सस्पेन्स अजून कायम आहे. धोनीने तसे संकेत दिलेले नाहीत. मात्र वर्ल्ड कप नंतर वेस्ट इंडीज दौऱ्यातून त्याने स्वतः माघार घेतली होती. तसेच द,आफ्रिका टी २० सिरीज त्याने सोडली आणि आता विजय हजारे ट्रॉफी तसचे बांगलादेशाच्या भारत दौऱ्यासाठीही तो खेळणार नसल्याचे जाहीर झाले आहे. डिसेम्बर मध्ये वेस्ट इंडीजचा संघ भारत दौऱ्यावर येत असुन त्यात ३ टी२० आणि तीन वनडे सामने होणार आहेत त्यात माही खेळेल अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Leave a Comment