15 हजारांच्या आत खरेदी करू शकता हे 10 टिव्ही

फेस्टिव सीझनच्या निमित्ताने अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर बंपर सेल सुरू झाला आहे. दोन्ही साईट्सवर हा बंपर सेल 4 ऑक्टोंबर पर्यंत सुरू राहिल. ग्राहक या दोन्ही साइट्सवर 15000 पेक्षा कमी किंमतीत शानदार टिव्ही खरेदी करू शकतात.

(Source)

एमआय एलईडी टिव्ही 4C PRO (32) HD –

शाओमीच्या या एमआय एलईडी टिव्ही 4C PRO (32) HD ची किंमत 10,999 रूपये आहेत. या टिव्हीमध्ये 32 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, ज्याचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सल आहे. यामध्ये 3 एचडीएमआय पोर्ट, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कंसोल आणि 2 यूएसबी पोर्ट मिळतील. तसेच, चांगल्या साउंडसाठी स्पीकर्स सपोर्ट देखील मिळेल. ग्राहक या टिव्हीमध्ये अँड्राइडचा वापर करू शकतील.

(Source)

टेलीफंकेन (32) HD –

या फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्राहक टेलीफंकेनचा टिव्ही केवळ 6,999 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. कंपनीने या टिव्हीमध्ये 32 इंचचा डिस्प्ले दिला असून, ज्याचे रिझॉल्यूशन हे 1366×768 पिक्सल आहे. शानदार साउंड क्वालिटीसाठी यामध्ये चार साउंड मोड्स देण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये 2 एचडीएमआय पोर्ट, ब्लू रे, गेमिंग कंसोल आणि 2 यूएसबी पोर्ट सारखे फिचर्स देण्यात आले आहे.

(Source)

ईएअरटेक (24) HD –

ईएअरटेकच्या या टिव्हीची किंमत 4,999 रूपये आहे. या टिव्हीचा डिस्प्ले 24 इंच असून, त्याचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. या टिव्हीला अल्ट्रा एचडी 4के, A+ ग्रेड आयपीएस पॅनल आणि प्रिमियम फिनिश डिजाईन देण्यात आले आहे. कनेक्टिविटीसाठी 1 एचडीएमआय पोर्ट आणि पेन ड्राइव्ह बरोबर हार्ड डिस्कसाठी 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहेत. याचबरोबर युजर्स अँड्राइड आणि वेगवेगळ्या भाषेत देखील वापरू शकतील.

(Source)

एडसन (32) HD –

अमेझॉनवर या टिव्हीची किंमत 6,799 रूपये आहे. यामध्ये 32 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. या टिव्हीमध्ये प्रिमियम फिनिश डिजाईन आणि आयपीएस पॅनल देण्यात आले आहे. साउंड क्वालिटीसाठी कंपनीने 2 वॉट आउटपुट बरोबर इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्स सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय 2 एचडीएमआय पोर्ट, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कंसोल आणि 2 यूएसबी पोर्टसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

(Source)

वू अल्ट्रा स्मार्ट (32) –

टेक कंपनी वू ने 32 इंच स्मार्ट टिव्ही 14,999 रूपयांच्या किंमतीत भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या टिव्हीमध्ये 32 इंचचा एचडी डिस्प्ले दिला आहे. कनेक्टिविटीसाठी 2 एचडीएमआय पोर्ट, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कंसोल आणि 2 यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. याचबरोबर टिव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस स्टूडियो साउंडचा सपोर्ट देण्यात आला आहे.

(Source)

सनसुई प्रो व्यू (32) HD –

ग्राहक हा टिव्ही फ्लिपकार्टवरून 9,999 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. यामध्ये 32 इंच डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. चांगल्या साउंडसाठी टू-बॉक्स शेप स्पीकर्स देण्यात आले आहेत.

(Source)

आयफॅलकॉन (32) Smart HD TV –

ग्राहक हा टिव्ही 11,700 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. 32 इंच डिस्प्ले असणाऱ्या या टिव्हीचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. युजर्ससाठी गुगल वॉइस सर्च, गूगल अप स्टोर आणि क्रोमकास्टचा वापर देखील करू शकतात. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी स्पीकर्स सेट देण्यात आले आहे.

(Source)

थॉमसन बी9 प्रो (32) Smart TV  –

थॉमसन कंपनीचा हा टिव्ही ग्राहक 9,499 रूपयांमध्ये खरेदी करू शकतात. 32 इंच डिस्प्ले असलेल्या या टिव्हीत आयपीएस पॅनेल देण्यात आला आहे. याशिवाय युजर्स या टिव्हीवर झी5 आणि युट्यूब अप सारखे एचडी कॉन्टेट देखील बघू शकतात.

(Source)

एलजी (32) HD Smart TV –

एलजीच्या या 32 इंच स्मार्ट टिव्हीची किंमत 13,999 रूपये आहे. या टिव्हीमध्ये झूम फिचर, आयपीएस पॅनेल आणि पॉवरफुल साउंड सपोर्ट देखील आहे.

(Source)

सॅमसंग (32 inch) HD –

सॅमसंगच्या या टिव्हीची किंमत 13,999 रूपये आहे. या टिव्हीत 32 इंच एलईडी डिस्प्ले देण्यात आला असून, रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी 20 वॉट स्पीकर आउटपुट देखील मिळेल. कनेक्टिविटीसाठी यूएसबी पोर्ट मिळेल.

Leave a Comment