काळे मिरी गुणकारी

black-pepper
आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातील प्रत्येक मसाला किंवा मसाल्याचा पदार्थ हा आरोग्यासाठी औषध म्हणून उपयुक्त असतो परंतु आपण त्यांचे औषधी गुणधर्म विसरून गेलो आहोत. काळ्या मिर्‍याचा विचार करण्यासारखा आहे. आपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिर्‍याचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत. विशेषतः पावसाळ्यामध्ये काळे मिरे मसाला म्हणून तर वापरले जातातच पण औषध म्हणूनसुध्दा वापरले जातात.

फ्ल्यूचा सामना करण्यासाठी – फ्ल्यूचा सामना करण्यास काळे मिरे उपयुक्त आहेत. विशेषतः थंडीच्या दिवसात होणारा फ्ल्यू काळ्या मिर्‍याचा काढा प्यायल्याने दुरूस्त होतो. फ्ल्यूसारख्या विकारावर औषध नाही असे सांगितले जाते. परंतु त्याच्या लक्षणावर इलाज केला जात असतो आणि ही लक्षणे काळ्या मिर्‍याच्या काढ्याने कमी होतात.

थंडीमुळे छाती भरून येते अशा वेळी क जीवनसत्त्वाचा अंतर्भाव असलेले काळे मिरे औषधी म्हणून फार गुणकारी ठरतात. काळे मिरे हे कर्करोग प्रतिबंधक समजले जातात. आपल्या शरीरातल्या विविध पेशीवर आघात करणारे छोटे मोठे विकार काळ्या मिर्‍याच्या काढ्याने आटोक्यात येऊ शकतात.

काळे मिरे त्वचेसाठी चांगले समजले जातात. संधीवाताच्या काही प्रकारांमध्ये जेव्हा सांध्यांचा दाह होतो तेव्हा काळे मिरे हा दाह कमी करतात. विशेषतः गुडघ्यातील दाह काळ्या मिर्‍यांनी कमी होतो. काळे मिरे अन्नपचनासही उपयुक्त मानले जातात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment