वाढदिवस विशेष; खर्चासाठी कधीकधी अंडी विकायचे कॉमेडी किंग मेहमूद


आपल्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांना गुदगुल्या करणारे कॉमेडी किंग महमूद अलीला यांना कोण ओळखत माहित नाही. अभिनेते महमूद अलींचा जन्म 29 सप्टेंबर 1933 रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी सीआयडी या चित्रपटापासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. भूत बंगला, पडोसन, बॉम्बे टू गोवा, गुमनाम, कुंवारा बाप हे त्यांचे काही संस्मरणीय चित्रपट आहेत. त्यांचे वडील मुमताज अली बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करायचे. आपल्याला माहित आहे का महमूद यांच्या पायात पडून महानायक अमिताभ देखील रडले होते. आज आम्ही तुम्हाला कॉमेडी किंगशी संबंधित असंख्य गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

घराची आर्थिक गरज भागवण्याकरिता महमूद यांनी अंडी विकणे आणि टॅक्सी चालविण्याचे काम देखील केले, परंतु लहानपणापासूनच महमूद यांची आवड अभिनयात होती. 1943 मध्ये त्यांना बॉम्बे टॉकीजच्या किस्मतमध्ये नशीब आजमावण्याची संधी मिळाली. आपल्या अभिनयाच्या जोरावर मेहमूद यांनी लाखो लोकांना वेड लावले.

जगाला हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन महमूद यांनाही त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांना टेबल टेनिस शिकवण्याचे काम देखील केले होते. टेनिस शिकवताना महमूद यांचा जीव मीना कुमारीची बहीण मधु हिच्यावर जडला आणि नंतर आत्महत्येची धमकी देऊन तिच्याशी लग्न केले.

त्या दरम्यान, ज्या अभिनेत्यासाठी टाळ्या वाजविल्या जात होत्या, ते होते मेहमूद. शूट संपल्यावर मेहमूद यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या जायच्या. मेहमूद हे असे एकमेव विनोद अभिनेते होते, जे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये नायकासोबत झळकायचे. लोक थिएटरमध्ये मेहमूद यांना पाहण्यासाठी जात असत. त्यावेळी असे मानने होते की चित्रपटाला हिट करायचे असेल तर मेहमूद हे आपल्या चित्रपटात असायला हवे हेही दिग्दर्शकाला चांगलेच माहित होते.

मेहमूद यांच्याविषयी असे म्हटले जाते की ते कधी रिहर्सल करताना दिसले नाही. ते जे काही करायचे, ते चित्रपटांमध्येच रहायचे. याच कारणास्तव बऱ्याच चित्रपटातील कलाकारांना त्यांचा हेवा वाटायचा. त्यामुळे महमूद यांना नायकापेक्षा जास्त पैसे मिळतात यावर त्यांचा आक्षेप होता. दशकांपर्यंत आपल्या चित्रपटांद्वारे लोकांची मने जिंकणार्‍या मेहमूद यांनी जवळजवळ 300 चित्रपटांत काम केले.

अमिताभ बच्चन आणि मेहमूद यांच्याबद्दल एक अतिशय रंजक किस्सा सांगितला जातो. वास्तविक, ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटाचे एक गाणे होते, ‘देखा ना हाय रे सोचा ना’ … मेहमूद यांना असे वाटत होते अमिताभ यांनी त्या गाण्यावर नृत्य करायला हवे, कारण अमिताभ यांना नाचायचे हे माहित नव्हते, मग काय अमिताभ यांनी मेहमूद यांना सांगितले ‘भाईजान मुझे नृत्य करना नहीं आता’ मला नाच कसा करायचा हे माहित नाही. पण मेहमूद यांना त्यांची काही दया आली नाही आणि ते म्हणाले की जो चालतो तोही नाचू शकतो आणि अमिताभ यांच्या आवाहनानंतरही मेहमूद यांनी त्यांना नृत्य करण्यास भाग पाडले आणि ते गाणे सुपरहिट झाले.

कॉमेडियन बीरबलने बीबीसीला सांगितले की, मेहमूद यांच्यासोबत मी मैं सुंदर हूं चित्रपटात काम केले होते. त्या चित्रपटाचे नायक विश्वजितजी होते, पण त्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना दोन लाख मिळाले आणि मेहमूदजी यांना आठ लाख मिळाले. हमजोली या चित्रपटात जीतेंद्रजी एक नायक होते, परंतु त्यानंतरही मेहमुदजी यांना त्यांच्यापेक्षा अधिक पैसे मिळाले.

सुरुवातीच्या काळात जेव्हा अमिताभ संघर्ष करीत होते, तेव्हा मेहमूद यांनीच त्यांना बराच काळ आपल्या घरात आसरा दिली होता. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दिली होती. ‘बॉम्बे टू गोवा’ यशस्वी झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना जंजीर चित्रपट मिळाला.

Leave a Comment