तब्बल 23 कोटींचा मासा त्यांनी सोडून दिला समुद्रात !


अनेक अकलानीय गोष्टी जगभरात घडत असतात. यात आता टुना नावाचा मासा चक्क आयर्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला. पण तुम्हालाही या माशाची किंमत वाचून धक्का बसेल. तब्बल 23 कोटी एवढी या माशाची किंमत आहे. हा मासा आयर्लंडच्या किनाऱ्यावर एक इसमाला सापडला, पण त्याने हा मासा लगेचच पाण्यात सोडून दिला. 8.5 फूट लांब ब्लुफिन टुना मासा वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीचे डेव्ह अडवर्डला समुद्रात सापडला.

यासंदर्भात आयरिश मिररने दिलेल्या वृत्ता, यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा आहे. या माश्याची जपानमध्ये 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षा जास्त किंमत आहे. दरम्यान मासा पकडण्यासाठी डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमने कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळे या ब्लुफिन टूना माशाला त्यांनी सोडून दिले. हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आले आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आले.

15 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात अॅड रिलीज प्रोग्राममध्ये डेव्ह अडवर्ड आणि त्याच्या टीमने भाग घेतला. ते 15 वेगवेगळ्या समुद्रांमध्ये या कार्यक्रमात फिरणार आहे. डेव्ह यांनी पकडलेल्या माशाचे वजन जवळजवळ 270 किलो होते. याआधी नॉर्वेच्या समुद्रात एक अजब दिसणारा मासा पकडण्यात आला होता, असा फोटो व्हायरल झाला होता. या माशाचे नाव रेअस फिश असे असून त्याचे डोळे फार मोठे होते.

Leave a Comment