टाटा कार खरेदीवर होंडा स्कूटर फ्री, फक्त चार दिवसांसाठी ऑफर


दिवाळी जसजशी जवळ येत आहे तसतसे नवीन ऑफर दिसू लागल्या आहेत. कार कंपन्या तसेच डीलर्स त्यांची विक्री वाढविण्यासाठी ग्राहकांना आकर्षक ऑफर देत असून अशी एक ऑफर टाटा मोटर्स डीलरशिपकडून आली आहे जेथे कार खरेदी केल्यावर स्कूटर मोफत दिली जात आहे.

विक्री वाढवण्यासाठी मध्य प्रदेशातील टाटा मोटर्सच्या डीलरने या दिवाळीत ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार टाटाची टियागो, टिगोर आणि नेक्सन कार खरेदी केल्यानंतर डीलरच्या वतीने होंडाची स्कूटर ग्राहकांना मोफत दिली जाईल. विशेष म्हणजे ही ऑफर येताच सोशल मीडियावर ती व्हायरल होऊ लागली. त्याचबरोबर या ऑफरला टाटा मोटर्सनेही दुजोरा दिला आहे.

असे पहिल्यांदाच होत आहे जिथे पहिल्यांदाच कार खरेदीवर स्कूटर विनाशुल्क देण्यात येत आहे. या ऑफर अंतर्गत टाटाची कार खरेदी केल्यानंतर होंडाची अ‍ॅक्टिवा आणि ग्रॅझिया स्कूटर विनामूल्य मिळेल. परंतु अशा काही अटी देखील आहेत ज्यात आपल्याला डिलरशिपशी संपर्क साधल्यानंतरच कळेल. तथापि, आजपर्यंत कोणीही अशी ऑफर दिली नाही. टाटा मोटर्सच्या ‘कार फेस्टीवल ऑफ कार’ सवलतीच्या कार्यक्रमाअंतर्गत ही ऑफर देण्यात येत आहे. ऑफर काहीही असो, परंतु ग्राहकांना याचा थेट फायदा होईल.

Leave a Comment