11 नोव्हेंबरपासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीला द्यावे लागणार ऐवढे पैसे


टेलिकॉम नियामक मंडळ अर्थात ट्रायने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) चा नवीन नियम लागू करण्याला मुदत वाढ दिली आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता 11 नोव्हेंबरपासून MNP चा नवीन नियम लागू होईल, जो यापूर्वी 30 सप्टेंबरपासून लागू केला जाणार होता.

ट्रायच्या या निर्णयामुळे मोबाईल ग्राहकांना नंबर पोर्टेबिलिटी लागू होण्यासाठी नवीन नियमांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नवीन नियमांतर्गत मोबाइल नंबर पोर्टिंगसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. पोर्ट सिस्टम अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांच्या अर्जाच्या 2 दिवसांच्या आत अनिवार्यपणे क्रमांक पोर्ट करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान सध्या या प्रक्रियेस 7 दिवस लागतात. ट्रायने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुधारित एमएनपी नियम जारी केले आणि 30 सप्टेंबरपासून लागू केले जाणार होते, ते आता 11 नोव्हेंबरपासून लागू होतील. यापूर्वी अंतिम मुदत वाढवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी 17 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर रोजी ट्रायची भेट घेतली होती. ते म्हणाले की नवीन सुविधेच्या चाचणीसाठी अधिक वेळ आवश्यक आहे जेणेकरून नंतर ग्राहकांची गैरसोय होऊ नये.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना नव्या निर्णयानुसार 5.74 पैसे द्यावे लागणार आहेत. नवीन एमएनपी दर 30 सप्टेंबरपासून लागू होणार होते. एमएनपीच्या किंमती बदलल्यामुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा फायदा होईल. कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या संख्येच्या पोर्टसाठी 19 रुपये भरावे लागतात. याशिवाय जिओ, एअरटेल, व्होडाफोन आणि बीएसएनएल या कंपन्या एका वर्षात 75 कोटी रुपयांची बचत करु शकतात.

Leave a Comment