आता फक्त 4000 रुपयांमध्ये बुक करू शकता बेनेली इम्पीरियल


नवी दिल्ली – बेनेलीने आपल्या रेट्रो स्टाईल मोटरसायकल इम्पीरियल 400च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. नवीन बेनेली इम्पीरियल 400 मोटरसायकल बेनेली मोटोबी रेंज मोटरसायकलद्वारे प्रेरित आहे, जी वर्ष 1950 मध्ये तयार केली गेली. ही बाईक ऑनलाइन किंवा ऑफलाइनही बुक करता येऊ शकते. ही बाइक ऑनलाईन बुक करण्यासाठी तुम्हाला बेनेली इम्पीरियलच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. बेनेली इम्पीरियल फक्त 4000 रुपयात बुक करु शकता.

ऑक्टोबर 2019 अखेर या बाईकची डिलिव्हरी सुरू होईल, असे मोटरसायकल उत्पादक कंपनीचे म्हणणे आहे. बेनेली इम्पीरियल 400 ही कंपनीची भारतात पहिली रेट्रो-स्टाईल मोटरसायकल आहे. या बाईकला सामान्य डिझाइनचा लुक मिळतो.

मुख्य हायलाइटबद्दल बोलायचे झाले तर त्यात एक स्प्लिट सीट, ट्विन पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक पीशूटर टाइप एक्झॉस्ट आहे. बाईकमध्ये 300 मिमी सिंगल डिस्क आणि 240 मिमी रियर डिस्क आहेत जी मानक एबीएससह आहेत. बेनेली इम्पीरियल 400 मध्ये 19 इंचाचा फ्रंट आणि 18 इंचाचा रिअर वायर स्पोक व्हील आहे, जो बाईकच्या डिझाईनशी मिळता-जुळता आहे.

इम्पीरियल 400 मध्ये सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 5,500 आरपीएमवर 20.4 हॉर्सपॉवर आणि 3,500 आरपीएमवर 28 एनएम टॉर्क प्रदान करते. बाईकमध्ये 373.5 सीसी इंजिन आहे. इम्पीरियल 400 मध्ये 12-लिटर इंधन टाकी आहे. बाईकमध्ये बीएस 6 नॉर्म्सवाले इंजिन मिळेल.

बेनेली इम्पीरियल 400ची किंमत इतर कंपन्यांशी असलेली स्पर्धा लक्षात घेता ठेवण्यात येईल. अद्याप कंपनीने त्याची किंमत जाहीर केलेली नाही. या बाईकचे काही भाग लोकल असतील. कंपनी बेनेली इम्पीरियल 400 वर प्रमाणित हमी देईल. कंपनी ही बाईक रेड, ब्लॅक आणि क्रोम या तीन रंगात बाजारात आणणार आहे.

Leave a Comment