हृदय विकार टाळण्यासाठी जीवन पद्धती बदला

heartattack
हृदय विकार हा केवळ भारतापुरताच नव्हे तर सार्‍या जगासमोरचा गहन प्रश्‍न होऊन बसला आहे. भारतात दरवर्षी २४ लाख लोकांना हृदय विकार असल्याचे लक्षात येते. तणाव, अनारोग्यकारक खाणे आणि झोपेचा अभाव यामुळे हा विकार बळावतो. २९ सप्टेंबर हा दिवस सार्‍या जगामध्ये हृदय विकार दिन म्हणून पाळला गेला. हृदय विकार टाळण्यासाठी काय करता येईल याबाबत बरेच प्रबोधन करण्यात आले. हृदय विकाराने दरवर्षी २५ लाख लोक मरतात. ही संख्या काही कमी करता येणार नाही, परंतु काही साध्या उपायांनी हृदय विकार टाळता मात्र येतो.

जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही सूचना केल्या असून लोकांनी आपली जीवन पद्धती बदलल्यास तसेच हृदय विकारास कारणीभूत ठरणारे अन्न टाळल्यास त्यांना हृदय विकारापासून सुटका करून घेता येईल असे म्हटले आहे. विशेषत: शारीरिक हालचाली हृदय विकार टाळण्यासाठी आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे.

खाण्यामध्ये फळांचा आणि भाज्यांचा वापर वाढवावा, त्याचबरोबर तेलगट पदार्थ जास्त खाऊ नयेत असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. मीठ कमी खावे, द्विदल धान्य या सदरात मोडणारी धान्ये प्राधान्याने खावीत, त्याचबरोबर चरबीयुक्त अन्न कमी खावे असे सुचविण्यात आले आहे. दररोज व्यायाम करणे, धूम्रपान टाळणे, सात ते आठ तास झोपणे, दारू न पिणे आणि अधूनमधून आरोग्याची तपासणी करून घेणे याही गोष्टींवर जागतिक आरोग्य संघटनेने भर दिला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment