शेतातील खाद्यपदार्थ

farm
महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपल्या महाराष्ट्रीय संस्कृती विषयी प्रेम असतेच. विशेषत: महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ङ्गार प्रसिद्ध आहे. मात्र राज्याच्या शहरी भागात राहणार्‍या अनेक नगरवासियांना आपल्या खास मराठी खाद्य पदार्थांचा स्वाद घेण्याची संधी कधी मिळत नाही. कधी तरी बदल म्हणून जेवायला एखाद्या हॉटेलात जावे तर तेथे पंजाबी मसाल्यांचा मारा केलेले मसालेदार पदार्थ खायला मिळतात. काही ठिकाणी खास महाराष्ट्रीयन जेवण म्हणून पोळी-भाजी दिली जाते. पण खरे तर पोळी हे काही महाराष्ट्रीयन खाद्य नाही. खरे महाराष्ट्रीयन खाद्य आहे भाकरी, चटणी, तुरीच्या दाळीचे वरण, दही इत्यादी. अशा प्रकारचे जेवण तर कोठेच मिळत नाही. कृषी पर्यटनामध्ये अशा खास मराठी खाद्य पदाथार्र्ंची खाद्यसेवा बहाल केली गेली तर तिथे हे खास मराठी खाद्य पदार्थ खाण्यासाठी लोकांची झुंबड उडल्याशिवाय राहणार नाही.

ज्वारीच्या पापड्या, निरनिराळ्या प्रकारचे सांडगे, कोंड्याचे पापड, ज्वारीच्या कण्या, खास मराठवाड्यातील वरणङ्गळे, उकड शिंगोळे, मोदक, उंडे, आंबील, दुधी भोपळ्याचे वडे, झुणका, मुद्दा भाजी, मेथ्याचे वरण, पूड चटणी, मिठ भुरका, भरीत, खिचडी, ताकाची कढी, असे किती तरी खास मराठी पदार्थ अजूनही ग्रामीण भागात खायला मिळतात. पण शहरात वास्तव्य करणार्‍या लोकांना या पदार्थांची नावे सुद्धा ऐकून माहीत नाहीत. अशा पदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय जर शेतात उपलब्ध करून दिली तर शहरवासी लोक नक्कीच त्यासाठी म्हणून शेतात यायला लागतील आणि शेतकर्‍यांना हा एक चांगला व्यवसाय उपलब्ध होईल. शहरातल्या किती लोकांना बैलगाडीत बसण्याचा अनुभव असेल ? अशा लोकांना बैलगाडीत बसण्याची सुद्धा एक मौज अनुभवता येते. म्हशीवर बसण्याचा सुद्धा एक आनंद असतो. म्हशी पाळणार्‍या शेतकर्‍यांची मुले म्हशीच्या पाठीवर बसून अगदी आनंदात ङ्गिरत असतात. तो आनंद आपणही उपभोगावा, असा मोह शहरातल्या अनेकांना होऊ शकतो. त्यातूनच पुण्याजवळच्या एका कृषी पर्यटन केंद्रात बङ्गेलो रायडिंग हा प्रकार सुरू करण्यात आला आहे आणि त्यासाठी २५ रुपये दर आकारला जातो.

हुरडा पार्ट्या हा प्रकार आता चांगलाच रुळायला लागला आहे. परंतु गव्हाच्या ओंब्या सुद्धा अशाच ओल्या भाजून गुळाबरोबर खाल्ल्या जातात. अर्धवट पक्व अवस्थेत आलेला हरभरा भाजून त्याचा हुळा करून खाण्याचीही पद्धत आहे. त्याचबरोबर भुईमुगाच्या ओल्या शेंगा भाजूनही खायला देता येतात. मुगाच्या आणि तुरीच्या शेंगा खाण्यात सुद्धा मजा येते. हे सारे खाद्य पदार्थ आणि गुर्‍हाळामध्ये काकवी, ताजा गूळ, ऊसाचा रस हे खायला-प्यायला देणे ही सुद्धा कृषी पर्यटनातली चांगली सेवा होऊ शकते. खरे सांगायचे तर कोंदट हवेत राहणार्‍या शहरवासीयांना झाडाखाली शांत झोप मिळाली तरी ङ्ग्रेश वाटते. झाडाच्या सावलीत झोपल्यानंतर मिळणारी स्वच्छ, ताजी, मोकळी, थंड हवा तो शहरामध्ये कुलर किंवा एअरकंडिशनर लावून मिळवत असतो. पण त्या हवेत त्याला समाधान मिळत नाही. शिवाय धारोष्ण दूध प्यायला देणे ही सुद्धा एक छान सेवा होऊ शकते.

Leave a Comment