वाढत्या वयात समुपदेशन महत्वाचे

counselling
प्रत्येकाच्या आयुष्यातील पौगंडावस्था ही अतीशय निर्णायक अशी अवस्था असते. या काळात मनावर जे संस्कार होतात ते जन्मभर टिकतात. एखाद्या माणसाचा स्वभाव कसा असावा हे त्याच्या पौगंडावस्थेतील अनुभवावरच ठरत असते. ही अवस्था अतीशय संवेदनशील असते. कारण याच अवस्थेत मुले आणि मुली वयात येतात. त्या काळात त्यांना नैराश्य आले किंवा त्यांच्या मनाने नकारार्थी विचारांची पकड घेतली तर जन्मभर ती अवस्था तशीच राहते.

असे असले तरी या वयात येणारे नैराश्य घालवणे मात्र तेवढे अवघड नाही. कारण हे वय संस्कारशील असते आणि याच वयात त्याचे समुपदेशन झाले, त्याची सकारात्मक वृत्ती वाढली तर जन्मभर तो त्याच पद्धतीने विचार करतो आणि एक सकारात्मक सक्रिय जीवन जगतो. म्हणजेच शालेय जीवनामध्ये मुलांना आणि मुलींना समुपदेशनाची फार गरज आहे. समुपदेशन करताना सांगितले गेलेले एखादे वाक्य त्याच्या आयुष्याचे सारे निर्णय प्रभावित करू शकते.

अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास या विद्यापीठात या संबंधात ६०० मुला-मुलींवर प्रयोग करण्यात आले. सुरुवातीला त्याच्या नोंदी घेण्यात आल्या आणि नंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले. नऊ महिन्यानंतर त्यांच्यात होणार्‍या बदलाच्या नोंदी घेतल्या गेल्या. तेव्हा त्यांच्यात बराच बदल झालेला आढळला. विशेषत: नैराश्याच्या आहारी जाण्याची शक्यता असलेल्या मुला-मुलींपैकी ३९ टक्के मुलांचे नैराश्य संपले.

Leave a Comment