रज्जोनिवृत्ती सुसह्य करण्यासाठी

retirment
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात वयाची चाळीशी उलटण्यापासून पन्नाशी गाठण्यापर्यंत कधीही येणारी ही अवस्था असते. वयाच्या तेराव्या वर्षांपासून तिच्या शरीरामध्ये प्रजनन क्षमता निर्माण झालेली असते. परंतु वयाची चाळीशी ओलांडल्या नंतर ती ओसरायला लागते. खरे म्हणजे ही काही वृद्धत्वाकडची वाटचाल नसते, ते आयुष्यातले एक स्थित्यंतर असते. पण या काळात महिलांना अनेक शारीरिक बदलातून जावे लागते. कारण हे स्थित्यंतर शारीरिक असते.

हा बदल होत असताना महिलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो, नैराश्याची भावना जागी होते आणि वजन वाढते. या सगळ्या गोष्टी औषधाने सुसह्य होत नाहीत, कारण हे सारे बदल हे हार्मोनमध्ये होणारे बदल असतात. तेव्हा काही सोप्या उपायांनी हे बदल सुसह्य करता येतात. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्यदायी आहार. अशा महिलांनी आपल्या आहारामध्ये फळांचा आणि भाज्यांचा वापर वाढवला तर मानसिक संतुलन टिकवून रहायला मदत होते. याच काळात कॉफी, मद्य अशा प्रकारचे द्रव पदार्थ शक्यतो टाळावे.

व्यायाम – रज्जोनिवृत्तीच्या काळात महिलांनी नियमित व्यायाम केल्यास या काळात हमखास जडणारे हृदयविकार किंवा मधुमेह असे विकार टळतात. व्यायामामध्ये योगासने आणि ध्यानधारणा यावर भर द्यावा, म्हणजे मनाचे आरोग्य टिकून राहते. आहारामध्ये विशेषत्वाने ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस् आणि ड जीवनसत्व यांचा भरपूर पुरवठा करणारे पदार्थ घ्यावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment