म्युझिक थेरपी अनेक विकारांवर उपयुक्त

music-therapy
तुम्ही मान्य करा की न करा, पण संगीताचा आपल्या आयुष्यावर आणि मन:स्थितीवर व्यापक आणि सखोल परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती संगीताला प्रतिसाद देत असते. व्हिक्टर ह्युगो यांनी म्हटल्याप्रमाणे संगीत हे शब्दांमधून व्यक्त न होणार्‍या भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्याचबरोबर आपल्या मनात उसळणार्‍या अनेक कल्पना उसळत तर असतातच पण त्या योग्य पद्धतीने व्यक्त होत नाहीत. त्यांचे योग्य माध्यम असते संगीत.

मानसिक अस्वस्थता, कर्करोग, निद्रानाश, खचलेपणा आणि व्यक्तिमत्वाशी निगडित असलेल्या अनेक समस्या संगीताच्या माध्यमातून सुटू शकतात. भारतामध्ये प्रदीर्घ काळपासून विविध रागांचा वापर विविध प्रकारच्या विकारांसाठी करण्याची परंपरा आहे. मग ते संगीत म्हणजे बासरी वादन असू शकेल किंवा हार्मोनियम वादन असेल. संगीताने माणसाची मन:स्थिती एकदम बदलून जाते. संगीत ही एक थेरपी आहे, उपचार पद्धती आहे. खालील विकारांवर संगीत उपयुक्त ठरते.

तणाव – संशोधनाने असे दाखवून दिलेले आहे की, तणावग्रस्त व्यक्तीला बासरी वादन ऐकवले की, त्याचा ताण कमी होतो. त्याचबरोबर त्याने अनेक प्रकारच्या वेदना सुद्धा कमी होतात. बासरी ऐकल्याने रक्तदाब कमी होतो. आपले कोणतेही आवडीचे संगीत तन्मयतेने आणि एकाग्रतेने डोळे मिटून ऐकले की, रक्तदाब नियंत्रणात राहतो.

रोज अर्धा तास आवडीचे संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके तर नियंत्रणात राहतातच आणि श्‍वास नियंत्रित होतात. या दोन्हींचा परिणाम मेंदूचे विकार झालेल्या रुग्णांवर सकारात्मकपणे जाणवतात. मायग्रेन आणि तीव्र डोकेदुखी यांच्यावर तर संगीताचा चांगलाच वापर होतो. तर त्यामुळे आपल्या मेंदूतील रक्तवाहिन्या शांत होतात. त्यामुळे मेंदू स्थिर होतो.

संगीत ऐकण्याने माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. कारण संगीत मेंदूला काही संदेश पोचवते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेले हार्मोन्स पाझरवण्याचा आदेश देते. त्याचबरोबर संगीत ऐकताना डोळे झाकून घेतल्यास मन शांत होते आणि मनाची एकाग्रता वाढून मेंदू तल्लख होतो. काही लोकांना विस्मरणाचा त्रास होत असतो, त्यांना संगीताने स्मरण येऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment