फोन फोबिया घातक

phone-phobia
मोबाईल फोन ही सोय आहे की व्यसन आहे असा प्रश्‍न अनेकदा मनात येतो, कारण हातात फोन पडलेली तरुण पिढी फोनच्या इतकी आहारी गेली आहे की, दुसरी सगळी कामे सोडून सातत्याने मोबाईलवर बोलत तरी बसले आहे किंवा मोबाईलमधले अन्य उद्योग करत बसलेली आहे. या सवयीचे फार घातक परिणाम आरोग्यावर होऊ शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा प्रकारे सातत्याने मोबाईल बघण्याने आपल्या आसपासच्या वातावरणाशी असलेला आपला संबंध तुटतो ही गोष्ट या तज्ज्ञांनी लक्षात आणून दिली आहे.

मोबाईल फोन हा आपला एक अवयवच झालेला आहे, इतकी लोकांना त्याची सवय झालेली आहे. मात्र ही सवय विकृतीत बदलली आहे की काय, असे वाटते. तशी ती बदलली नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यासाठी एक परीक्षा घेतली पाहिजे. ज्या लोकांना मोबाईलची भारी सवय झालेली असते ते मोबाईलशिवाय पाच मिनिटे सुद्धा स्वस्थपणे जगू शकत नाहीत.

त्यासाठी घरी मोबाईल ठेवून बाहेर फिरायला जावे. मोबाईलच्या आहारी गेलेला माणूस अशा वेळी जवळ मोबाईल नाही म्हणून चिडचिडा होतो. मात्र जो अजून मोबाईलच्या आहारी गेलेला नाही तो माणूस मोबाईल जवळ नसला तरीही शांतपणे वागतो. अनेक लोकांना खिशात मोबाईल नसेल तर काही तरी हरवल्यासारखे वाटते. मात्र जे लोक त्याच्या आहारी गेलेले नाहीत ते लोक मोबाईलशिवाय छान जगू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment