इस्रोमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या संपुर्ण माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्त्रो) मध्ये नोकरीची संधी आहे. इस्त्रोने वैज्ञानिक आणि इंजिनिअर पदासांठी अर्ज मागवले आहेत. इस्त्रोची अधिकृत वेबसाइट isro.gov.in वर या पदासाठी अर्ज करता येईल. 21 पदासांठी ही भरती आहे.

तारीख –

अर्ज ऑनलाइन जमा करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2019 आहे व या पदासाठी 12 जानेवारी 2020 ला परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

वयाची अट –

14 ऑक्टोंबर 2019 पर्यंत उमेदवाराचे वय हे 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसुचित जनजातीच्या उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षांची सुट आहे. ओबीसीसाठी 3 वर्षांची सुट आहे.

शुल्क –

अर्जासाठी तुम्हाला 100 रूपये भरावे लागतील. तसेच महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, बेंचमार्क दिव्यांग आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्कामध्ये सुट आहे.

वेतन आणि भत्ता –

किमान वेतन 56100 रूपये आहे.

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराकडे बीई अथवा बीटेकची डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच ग्रेज्युएशनमध्ये कमीत कमी 65 टक्के मार्क्स किंवा 6.84/10 सीजीपीए असायला हवा.

 

Leave a Comment