ट्रिपल रिअर कॅमेरा असणारा हा स्मार्टफोन केवळ 7,999 रूपयात

हाँगकाँगची कंपनी टेक्नोने नवीन स्मार्टफोन ‘स्पार्क 4’ भारतात लाँच केला आहे. कंपनीने या फोनची किंमत 7,999 रूपये ठेवली आहे. ही किंमत 3 जीबी रॅम+32 जीबी मॉडेलच्या व्हेरिएंटची आहे. तर या फोनचे दुसरे व्हेरिएंट 4 जीबी + 64 जीबीची किंमत 8,999 रूपये आहे.

फोनमध्ये 6.5 इंच एचडी+ डॉट नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 90 टक्के स्क्रीन-टू बॉडी रेशिओ आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये 13 मेगापिक्सल एआय प्रायमेरी सेंसर असणारा ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर एलईडी फ्लॅशबरोबर 2 मेगापिक्सल सेंकेंड्री कॅमेरा आणि तिसरा लो-लाइट कॅमेरा सेंसर देखील देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये प्लॅशसोबतच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

3 जीबी रॅम असलेले व्हेरिएंट ब्लू आणि रॉयल पर्पल रंगामध्ये उपलब्ध आहे. तर 4 जीबी रॅम असलेले व्हेरिएंट बे ब्लू आणि मॅजेस्टिक पर्पल रंगामध्ये उपलब्ध आहे. हा फोन अँड्राइड 9.0 पायवर कार्य करतो. यामध्ये 4000 mAh ची बॅटरी देखील देण्यात आलेली आहे.

Leave a Comment