सेल पूर्वीच किंग खानने खरेदी केला आयफोन ११ मॅक्स

अॅपल आयफोन ११ सिरीजची विक्री २७ सप्टेंबरपासून भारतात सुरु झाली असली तरी आयफोन ११ सेल सुरु होण्यापूर्वीच प्रीबुकिंग मध्येच तो आउट ऑफ स्टॉक झाल्याची बातमी आम्ही दिली होती. पण बॉलीवूड किंग खान म्हणजे आपला शाहरुख खानने आयफोन ११ चा सेल सुरु होण्यापूर्वीच हुशारी दाखवून आयफोन ११ प्रो मॅक्स खरेदी केला असून त्याने स्वतः याबाबत एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.

या पोस्ट मध्ये किंग खान म्हणतो, हा फोटो आयफोन एक्स मधून घेतोय पण आयफोन ११ प्रो मॅक्स मधून फोटो काढण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. याचा ट्रिपल कॅमेरा सेट अफलातून असून असे डिव्हाईस सादर केल्याबद्दल त्याने अॅपलला धन्यवाद दिले आहेत. अॅपलने आयफोन ११ सिरीज १० सप्टेंबरला लाँच केली असली तरी भारताच्या बाजारात हा फोन २७ सप्टेंबर पासून उपलब्ध केला आहे.

आयफोन ११ मॅक्ससाठी ६.५ इंची डिस्प्ले ओलेड पॅनल सह दिला गेला असून त्याला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्यात १२ एमपीचा वाईड अँगल, १२ एमपीचा अल्ट्रा वाईड अँगल आणि तिसरा टेलीफोटो लेन्स कॅमेरा आहे. ६४ जीबी स्टोरेज फोनसाठी १.०९,९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेजसाठी १,२३,९०० रुपये तर ५१२ जीबी स्टोरेजसाठी १,४१,९०० रुपये मोजावे लागतील.

Leave a Comment