पाणी साचलेल्या पिचवर सचिनची जबरदस्त बॅटिंग, व्हिडीओ व्हायरल

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पाणी साचलेल्या पिचवर फलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सचिनने ट्विट करत लिहिले की, खेळाप्रती असलेले वेड आणि प्रेमामुळे तुम्ही नेहमीच सराव करण्यासाठी नवनवीन पध्दती शोधत असता. याही पेक्षा अधिक म्हणजे, तुम्ही त्याचा आनंद घेता. सचिनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तो पाणी साचलेल्या पिचवर सराव करत आहे. मात्र यामध्ये तो सरावासाठी टेनिस बॉलचा उपयोग करत आहे.

सचिनने शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. हाव्हिडीओ ट्विटरवर आतापर्यंत 3.5 लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितला असून, 50 हजारांपेक्षा अधिक लाईक्स देखील आले आहेत.

 

 

Leave a Comment