मुंबई पोलिसांनी का केले वनप्लस 7टी कॅमेऱ्याचे ट्विट ?

काही दिवसांपुर्वीच स्मार्टफोन कंपनी वनप्लसने नवीन स्मार्टफोन वनप्लस 7टी भारतात लाँच केला आहे. लाँचिंगनंतर फोन सोशल मीडियावर ट्रेंडिग आहे. आता मुंबई पोलिसांनी या फोनचा ट्रॅफिक नियमांसंबधी जागृकता पसरवण्यासाठी असा वापर केला आहे, ज्यामुळे मुंबई पोलिसांची चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांनी हा नवीन वनप्लस 7टी स्मार्टफोन एवढा आवडला आहे की, त्यांनी याला ट्रॅफिक लाइटच बनवले आहे.

मुंबई पोलिसांनी वनप्लस 7टी बरोबर हटके प्रयोग करत आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. मुंबई पोलिसांनी फोनच्या मागील तीन कॅमेरेचा वापर ट्रॅफिक सिग्नल दर्शवण्यासाठी केला आहे. मुंबई पोलिसांची ही संदेश देण्याची हटके पध्दत युजर्सला आवडत आहे.

मुंबई पोलिसांनी फोटो शेअर करत लिहिले की, सुरक्षेसाठी नेहमी ट्रॅफिक लाइटवर लक्ष ठेवावे.

या फोटोवर वनप्लसचा लोगो जरी नसला, तरी हा फोटो वनप्लस 7टी शी मिळता जुळता आहे. याआधी मुंबई पोलिसांनी वाहनचालकांमध्ये जागृकता पसरवण्यासाठी अशाच अनोख्या पध्दतींचा वापर केलेला आहे. वाहनचालक, युवकांमध्ये जागृकता पसरवण्याच्या उद्देशाने मुंबई पोलिस अशा प्रकारचे ट्विट नेहमी करत असतात.

 

Leave a Comment