मारूतीच्या या गाडीवर आहे 1.65 लाखांची सुट

जर तुम्ही मारूतीची कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कंपनीने बलेनो आरएस या कारवर तब्बल 1 लाख रूपयांची सुट दिली आहे. याच व्यतरिक्त 65 हजारांची इतर सुट देखील या कारवर आहे.

बलेनो कार दोन पेट्रोल इंजिन पर्यायामध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 1.2 लिटरचे इंजिन आहे आणि दुसरे 1 लिटर आरएस व्हर्जन आहे, ज्याद्वारे 20 अधिक पॉवर बचत होते, मात्र त्याची किंमत 1.30 लाख रूपये अधिक  आहे.

(Source)

या सुटमुळे बलेनो आरएसची एक्स शोरूम किंमत 7.9 लाख रूपये आहे. याचबरोबर अतिरिक्त 50 हजारांचे कॅश डिस्काउंट आणि 15 हजार रूपये एक्सचेंज बोनस देखील ग्राहकांना मिळेल.

(Source)

याआधी देखील कंपनीने अनेक कारच्या किंमत 5 हजारांनी कमी केल्या आहेत. यामध्ये ऑल्टो 800, ऑल्टो के10, स्विफ्ट डिझेल, सेलेरियो, बलेनो डिझेल, इग्निस, डिजायर डिझेल, टूर एस डिझेल, विटारा ब्रेजा आणि एस क्रॉसच्या व्हेरिएंट्सचा समावेश आहे.

Leave a Comment