अशी आहे स्वदेशी बनावटीची आयएनएस खंदेरी

गेली 10 वर्षांची मेहनत आणि अनेक चाचण्यांचे यशस्वी परिक्षण केल्यानंतर स्वदेशी बनावटीची पाणबुडी आयएनस खंदेरी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीविषयी काही रोचक माहिती जाणून घेऊया.

समुद्रामध्ये 40 ते 45 दिवस राहून 12 हजार किलोमीटर जाण्याची या पाणबुडीमध्ये क्षमता आहे. याआधी कलवरी स्कॉर्पिअन श्रेणीतील पहिली पाणबुडी होती. त्यानंतर आयएनएस खंदेरी बनवण्याची सुरूवात झाली. नौदल मागील दोन वर्षांपासून आयएनएस कलवरीचा वापर करत आहे.

(Source)

या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आहे. तर रूंदी 12.3 मीटर आहे. या पाणबुडीत समुद्रात 300 मीटर खोल जाण्याची क्षमता आहे. या पाणबुडीच्या समुद्रात चालल्याने समुद्राच्यावरील भागावर कोणत्याही प्रकारच्या हालचालींचा अंदाज लावणे अवघड आहे.

ही पाणबुडी 12 हजार किमी पर्यंत समुद्रात प्रवास करू शकते. प्रोजेक्ट 75 च्या अंतर्गत देशामध्ये बनलेली स्कॉर्पिअन श्रेणीची आयएनएस खंदेरी दुसरी पाणबुडी आहे. खंदेरीचा पाण्याच्या आत ताशी वेग 20 नॉटिकल मैल आणि पाण्यावरती 11 नॉटिकल मैल आहे.

(Source)

या पाणबुडीची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये 7 एप्रिल 2009 सुरू आहे. 12 जानेवरी 2017 याचे लाँचिंग करण्यात आले व 1 जून 2017 पासून याचे समुद्र परिक्षण करण्यात आले. अनेक चाचण्यांचे परिक्षण केल्यानंतर अखेर आयएनएस खंदेरी भारतीय नौदलात सामिल झाली आहे.

या पाणबुडीमध्ये 360 बॅटऱ्या आहेत. प्रत्येक बॅटरीचे वजन 750 किलोग्राम आहे. यामध्ये असलेल्या परमानेंटली मॅग्नेटाइज्ड प्रोपलसन मोटारमुळे पाणबुडी समुद्रात एकदम शांत राहते.

(Source)

समुद्रात देखील पाणबुडीचा आवाज येत नसल्याने, शत्रूला पाणबुडी शोधणे अवघड होते. यामध्ये 1250 किलोवॉटचे दोन डिझेल इंजिन आणि 6 टॉरपीडो ट्यूब आहेत. दोन ट्यूब क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता देखील आहे आणि यात 12 टॉर्पिडो ठेवता येऊ शकतात.

 

 

Leave a Comment