भारतातील असा बाजार जेथे आहेत केवळ महिलाच दुकानदार

मणिपूरच्या राजधानी इंफालमधील ईमा कॅथेल बाजारात एकाही दुकानाचे संचालन पुरूष करताना दिसणार नाही. पुरूष केवळ येथील दुकानावर सामान खरेदी करण्यासाठी येतात. मणिपुरी भाषेत ईमाचा अर्थ आई असा होता आणि कॅथेलचा अर्थ बाजार, म्हणजेच आईद्वारे संचालित केला जाणार बाजार. हा आशियातील महिलांद्वारे चालवला जाणार सर्वात मोठा बाजार असून, येथे केवळ विवाहित महिलाच दुकानदार असतात. बाजारात 5 हजार महिला दुकानदार आहेत. प्रामुख्याने स्थानिक स्तरावर उत्पादन केल्या जाणाऱ्या वस्तू, हस्तनिर्मित वस्तू ज्यामध्ये गृह-गृहस्थीच्या वस्तू असतात आणि कपडे विकले जातात. आठवड्याच्या 7 दिवस चालणारा हा बाजार सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू असतो. बाजारातील प्रत्येक काम महिला करतात. केवळ ट्रकमधील सामान खाली करण्याचे काम पुरूष करताना दिसतात.

(Source)

पुरूष युध्दावर गेल्यावर महिलांनी सांभाळली जबाबदारी –

1553 मध्ये स्थानिक शासकाद्वारे इंफालमध्ये एक श्रम प्रणाली लागू करण्यात आल्याने बाजाराची सुरूवात झाली. यामुळे मैती समुदायातील पुरूषांना घरापासून लांब शेती करण्यासाठी अथवा युध्दासाठी पाठवण्यात आले. या परिस्थितीत महिला घर चालवण्यासाठी गावातच स्वतः बनवलेल्या वस्तू विकू लागल्या. याप्रकारे काही मोजक्याच महिलांनी मिळून या बाजाराची सुरूवात केली.

(Source)

ब्रिटिश सरकारचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न –  

1981 मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे स्थानिक स्तरावर उत्पादन केलेले धान्य परदेशात निर्यात करणे, पाण्यावर कर यासारखे कायदे आणल्याने बाजारावर मोठा परिणाम झाला. 1939 मध्ये ब्रिटिशांच्या कायद्याविरोधात महिलांनी ‘नुपी लान’ म्हणजेच महिलांचे युध्द देखील सुरू केले होते. आंदोलन दाबण्यासाठी सरकारने बाजाराची जमीन आणि इमारत परदेशी लोकांना विकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या महिला आपली जमीन वाचवण्यात यशस्वी झाल्या.

(Source)

वार्षिक कमाई –

हा बाजाराचे व्यवस्थापन महिला संघटनेद्वारे केले जाते. महिला दुकानदार 73 हजार ते 2 लाख रूपयांपर्यंत वार्षिक कमाई करतात. या बाजाराचे वार्षिक उत्पन्न 40 ते 45 कोटी आहे.

Leave a Comment