90 व्या वाढदिवसानिमित्त गानकोकिळेवर चोहोबाजुंनी शुभेच्छांचा वर्षाव

गानसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी अनेक दशकं आपल्या गाण्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांना भारत रत्न, पद्म भूषण, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. 1989 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद अभिनेता धर्मेंद्र, गृहमंत्री अमित शाह, सचिन तेंडूलकर, राज ठाकरे या सारख्या अनेक नेतेमंडळी, सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्विटरद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गृहमंत्री अमित शाह लता मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्या पोट्रेटचे केलेले संकलन प्रकाशित करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने देखील व्हिडीओ शेअर करत खास पध्दतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वैश्विक वैभव असे म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता मंगेशकर यांना शुभेच्छा देताना लिहिले की, आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली ७७ वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

अभिनेते धर्मेंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत लता मंगेशकर यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गायिका लता मंगेशकर यासारख्या अनेक नेते आणि सेलिब्रेटींनी लता मंगेशकर यांना 90 व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment