गिनीज मध्ये नाव असलेल्या वयोवृद्ध नाभिकाचे १०८ व्या वर्षी निधन

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध नाभिक अशी नोंद गिनीज बुक मध्ये झालेले अँथोनी मॅनकीनेली यांचे वयाच्या १०८ व्या वर्षी १९ सप्टेंबर रोजी न्युयॉर्क येथे निधन झाले. वयाच्या १२ व्या वर्षीपासून त्यांनी केशकर्तन करायला सुरवात केली होती आणि अखेरपर्यंत ते हे काम करत होते. सतत ९६ वर्षे यांनी हे काम केले असे त्यांच्या नातवाने सांगितले. २०१८ मध्ये अँथोनी मॅनकीनेली यांच्या नावाची नोंद गिनीज बुक मध्ये केली गेली होती.

अँथोनी मॅनकीनेलीच्या नातवाने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या आठव्या वर्षी ते अमेरिकेत आले होते आणि १२ व्या वर्षीपासून त्यांनी केशकर्तन काम सुरु केले होते. त्यांना शेवटपर्यंत या व्यवसायातून निवृत्त होण्याची इच्छा नव्हती. आयुष्यभर ते हेल्दी होते पण अखेर फेब्रुवारी मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यांनी जेव्हा केशकर्तनाचे काम सुरु केले तेव्हा सुरवातीला ते यासाठी २५ सेंट आकारत असत. या व्यवसायात होत गेलेले सारे बदल त्यांनी स्वीकारले आणि ते आत्मसात केले होते त्यानुसार त्यांनी स्वतः मध्येही बदल घडविले होते.

Leave a Comment