सरकारच्या या तीन योजना तुमचा भविष्यकाळ करू शकतात सुरक्षित

देशातील नागरिकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे अनेक महत्त्वाच्या योजना चालवल्या जात आहेत. या योजना आर्थिकदृष्ट्या मागास व मध्यमवर्गातील समाजांबरोबरच इतर समाजातील नागरिकांसाठी देखील फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन योजनांची माहिती सांगणार आहोत, या योजनांचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ दोन्ही ही सुरक्षित करू शकता.

नॅशनल पेंशन योजना –

केंद्र सरकारची ही योजना निवृत्तीनंतर आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी बनवण्यात आली आहे. वयाच्या 60 वर्षानंतर याचा फायदा मिळतो. या योजनेंतर्गत वृध्दांना दर महिन्याला ठराविक रक्कम उपलब्ध करून दिली जाते. ही योजना पेंशन फंड रेगुलेटरी अँन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएफआरडीए) द्वारे चालवली जाते. या योजनेची खास गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक केल्याने आयकर अधिनियमातील कलम 80 (सीसीडी) अंतर्गत करामध्ये 50 हजार रूपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळते.

या योजनेत 18 ते 60 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यासाठी किमान रक्कम 1000 रूपये गुंतवावे लागतात.

(Source)

अटल पेंशन योजना –

ही योजना असंघटित क्षेत्रातील लोकांना लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. या योजनेत दर महिन्याला काही रक्कम गुंतवावी लागते. जेव्हा तुमचे वय 60 वर्ष होते, त्यावेळी तुम्हाला दरमहिन्याला 5 हजार रूपये पेंशन प्राप्त होते. या योजनेमध्ये 18 ते 60 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते.

पब्लिक प्रोव्हिंडट फंड (पीपीएफ) –

ही योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदेशीर समजली जाते. टॅक्स कंसल्टंट आणि करिअर प्लॅनर सर्वच जण या योजनेत गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. कारण या योजनेमुळे करामध्ये सूट, व्याजदर व अन्य सुविधा देखील मिळतात. कोणत्याही बँकेत अथवा पोस्टात तुमचे सेव्हिंग खाते असेल तर त्याद्वारे तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता. तुम्ही ऑनलाइन पध्दतीने देखील या योजनेत पैसे गुंतवू शकता. पीपीएफ अकाउंटमध्ये तुम्ही 1 वर्षात 500 रूपयांपासून ते 1.5 लाख रूपये गुंतवू शकता.  या योजनेत 15 वर्ष गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment