अमेरिकेच्या टेक्सासमधील पहिल्या शीख पोलिस अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेतील टेक्सासमधील पहिल्या पहिले पगडीधारी शीख पोलिस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. भारतीय-अमेरिकन शीख पोलिस संदीप सिंह टेक्सासमधील ह्युस्टन नॉर्थ वेस्ट हॅरिस काउंटी येथे ट्रॅफिक थांबवत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या आल्या.

सांगण्यात येत आहे की, संदीप धालीवाल यांनी एक पुरूष आणि महिलेचे वाहन थांबवले. त्यानंतर गाडीतील एकाने बाहर येत धालीवाल यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संदीप विभाग 10 मध्ये कार्यरत होते. चेकिंग दरम्यान संदीप यांनी कार थांबवली. त्यावेळी त्यातील एकाने बाहेर येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. शूटरला एका शॉपिंग सेंटरच्या बाहेर बघण्यात आलेले आहे.

47 वर्षीय आरोपी रॉबर्ट सोलिसला अटक करण्यात आलेली आहे. हे कृत्य का केले याबाबत चौकशी सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी म्हटले की, विभागाने एक हिरो गमावला. ते अनेक जणांसाठी एक उदाहरण होते.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

Leave a Comment