सत्यमेव जयतेच्या सिक्वेलमध्ये जॉनसोबत दिसणार दिव्या खोसला


2018 मध्ये अनेक विक्रम मोडणाऱ्या जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते या चित्रपटाचा आता सिक्वल बनवण्यात येणार आहे. दिग्दर्शक मिलाप मिलन झवेरीच्या चित्रपटात यावेळी जॉनच्या विरुद्ध दिव्या खोसला कुमार दिसणार आहेत. या चित्रपटातील आपल्या एन्ट्रीसंदर्भात दिव्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच 2 ऑक्टोबर 2020 रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे.


भूषण कुमार, कृष्णा कुमार, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. हा चित्रपट 2020 मध्ये गांधी जयंती म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल. मिलाप मिलन झवेरी आपला आगामी ‘मरजावां’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘सत्यमेव जयते -२’ वर काम सुरू करणार आहे.

2018 मध्ये 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट फक्त 45 कोटी रुपये होता. चित्रपटाचे लाइफ टाइम कलेक्शन 88.15 कोटी होते. या चित्रपटात जॉन, मनोज बाजपेयी, आयशा शर्मा, अमृता खानविलकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटात नोरा फतेहीचा आयटम नंबर दिलबर प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरला होता.

Leave a Comment