दिल्ली मध्ये सुरु होतेय सॅटेलाइट आधारित पार्किंग

माणसाच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. आता वाहन पार्किंग सिस्टीममध्ये सुद्धा नवे तंत्रज्ञान आले असून देशाची राजधानी दिल्ली येथे पहिले सॅटेलाईट आधारित पार्किंग सुरु होत आहे. ही पार्किंग मॅनेजमेंट सिस्टीम दिल्लीच्या कमलानगर भागात सुरु होत असून अश्याप्रकारची सिस्टीम कोलकाता येथे यापूर्वीच सुरु झाली असल्याचे समजते.

या तंत्रज्ञानात पार्किंग एरिया जिओ टॅग्ड केला जातो. त्यात पार्किंगच्या जागेच्या नावापासून तिचे अंतर असे सर्व डीटेल्स नोंदविलेले असतात. या जागेचे सॅटेलाईट कडून मॉनिटरिंग केले जाते. युजर त्यासाठीचे अॅप डाऊनलोड करून घेतो. वाहन पार्क करताना या अॅपच्या माध्यमातून वाहन नोंदणी नंबर लिंक केला जातो आणि वाहनाचे पार्किंग होताच पार्किंग मीटर आपले अॅप सुरु करतो. पार्किंग मधून वाहन काढले गेले की डिजीटल पेमेंट करता येते. हे पेमेंट मोबाईलवरूनही करता येते.

नियम मोडणाऱ्यावर सिक्युरिटी कॅमेरा आणि सॅटेलाईट तर्फे मॉनिटरिंग केले जाते. यात युजरला पार्किंग तिकीट मिळते आणि या पार्किंगचे सर्व नियंत्रण मास्टर कंट्रोल सेंटरकडून केले जाते असे समजते.

Leave a Comment