लोक आता खरेदी करू शकणार हा भन्नाट ‘रोबोट डॉग’

इंजिनिअरिंग आणि रोबोट डिझाईन करणारी कंपनी बोस्टन डायानिक्सने बाजारात रोबोट डॉग लाँच केला आहे. सध्या केवळ निवडक ग्राहकांसाठीच हा रोबोट कुत्रा उपलब्ध आहे. ‘स्पॉट नाव’ असलेल्या या रोबोट डॉगचा व्हिडीओ कंपनीने युट्यूबवर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की, नेव्हिगेट करतो, याच बरोबर बिल्डिंग बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू उचलू शकतो. खराब हवामानात देखील सहज काम करण्याची या रोबोटमध्ये क्षमता आहे.

हा रोबोट 1.6 मीटर प्रती सेंकद वेगाने धावू शकतो. यामध्ये 360 डिग्री कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ज्याद्वारे स्पॉट चारही बाजूचे दृश्य सहज बघू शकेल. हा डस्ट आणि वॉटरफ्रुफ आहे. याशिवाय मायन्स 20 ते 45 सेल्सियस तापमानात देखील काम करू शकतो.

स्पॉट रोबोट केवळ कंस्ट्रक्शन साइट, गॅस, वीज कंपनी आमि सार्वजनिक सुरक्षा इत्यादी ठिकाणांच्या ग्राहकांसाठीच उपलब्ध असणार आहे. यासाठी कंपनीला अर्ज पाठवावा लागेल.

कंपनीने या रोबोट डॉगची किंमत स्पष्ट केलेली नसली तरीही एका कारच्या किंमती एवढी याची किंमत असण्याची शक्यता आहे. कंपनीने 2015 मध्ये या डॉगला इंट्रोड्युस केले होते. त्यावेळी याच्यावर काम सुरू होते.

कंपनीने या रोबोट डॉगबरोबर त्याचा छोटा भाऊ ‘स्पॉट मिनी’ देखील बनवला आहे. तो अडीच फुट आहे.

Leave a Comment