प्लास्टिकची जागा घेणार बांबूच्या बाटल्या

प्लास्टिकच्या बाटल्यांवर अखेर पर्याय सापडला आहे. एमएसएमआय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी ग्रामोद्योग आयोगाने बांबूच्या बाटल्यांची निर्मिती केली आहे. या बाटलीची क्षमता 750 एमएलची आहे. या बाटल्यांची किंमत 300 रूपयांपासून सुरू आहे.

या बाटल्या पर्यावरणाला पुरक असून, टिकाऊ देखील आहेत. एक ऑक्टोंबरला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी या बाटल्या लाँच करतील. दोन ऑक्टोंबरपासून खादी स्टोरमध्ये या बाटलींची विक्री सुरू होईल. दोन ऑक्टोंबरला गांधी जयंतीच्या निमित्तीने एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली जाणार आहे.

केवीआयसीद्वारे आधीच प्लास्टिकच्या ग्लासाऐवजी कुल्लडची निर्मिती करण्यास सुरूवात झाली आहे. या प्रक्रियेतर्गत आतापर्यंत मातीचे 1 कोटी कुल्लड बनवण्यात आले आहेत. केवीआयसीने आर्थिक वर्षाच्या अखेर पर्यंत 3 कोटी कुल्लड बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

केवीआयसीचे चेअरमन वी. के. सक्सेना यांनी सांगितले की, बांबूच्या बाटल्यांची विक्री सुरू झाल्यास, त्यातून रोजगार निर्मिती होईल. भारत बांबू चा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. मात्र आपण याचा उपयोग 5 टक्के देखील करत नाही. तर चीन आपल्या फर्निचरमध्ये 90 टक्के बांबूचा वापर करतो.

 

Leave a Comment