गुलाबपाण्याचे काही उपयोग

rose-water
कडक उन्हाळ्यात किंवा उन्हाळा नसतानाच्या काळातीलही उन्हामुळे त्वचेची बरीच हानी होऊ शकते. ती टाळण्यासाठी काही उपाय योजावे लागतात आणि त्या करिता गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाब पाण्याचा वापर केल्यानंतर आढळलेल्या त्याच्या फायद्यानुसार असे लक्षात आले आहे की त्वचेसाठी गुलाबपाणी फार उपयुक्त असते. विशेषतः जेव्हा त्वचेची जळजळ होते तेव्हा गुलाबपाणी त्वचेवर लावल्यास ती जळजळ कमी होते.

गुलाबपाण्याच्या वापराने त्वचेच्या रंध्रातील धूळ धुतली जाते आणि त्वचा स्वच्छ होते. त्यामुळे चकाकी वाढण्यास मदत होते. कारण धूळ झटकली गेल्याने त्वचेची रंध्रे मोकळी होतात आणि त्यातून हवा चांगली खेळते. त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होतो जो तिला उपयुक्त ठरतो.

गुलाबपाण्याच्या त्वचेसाठीचा वापर सकाळी किंवा संध्याकाळीही केला तरी चालतो. सकाळी उठल्याबरोबर गुलाबपाण्याने चेहरा स्वच्छ करावा म्हणजे कापसाच्या बोळ्यावर गुलाबपाणी घेऊन त्याने त्वचा पुसून घ्यावी. असाच प्रयोग रात्री झोपतानाही केला तरी चालतो त्यामुळे दिवसभरात त्वचेत अडकलेली धूळ स्वच्छ केली जाते. गुलाबपाणी काही वेळा केसांच्या स्वच्छतेलाही वापरले जाते आणि घरगुती सौंदर्यप्रसाधनांमध्येही त्यांचा चांगला वापर होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment