इन्टरव्ह्यू आणि वेषभूषा

dresscode
इन्टरव्ह्यूला जाताना कपडे कसे घालावेत असा प्रश्‍न अनेकदा मुलांच्या आणि मुलींच्या समोर उभा रहात असतो. पण या प्रश्‍नाचे नेमके उत्तर देणे कठीण आहे. माणसाचा प्रभाव त्याच्या वेषभूषेवरून पडत असतो हे खरेच आहे त्यामुळे कपडे कसे घालावेत या प्रश्‍नाचे एका वाक्यात उत्तर देता येते. ते म्हणजे, प्रभाव पडेल असे कपडे घालावेत. असे उत्तर देण्याने सारे प्रश्‍न सुटत नाहीत कारण प्रभाव हा शब्द व्यक्ति सापेक्ष असतो.

एखाद्या माणसावर एका वेषभूषेचा प्रभाव पडेल पण त्याच कपड्यामुळे दुसर्‍या माणसावर वाईट प्रभाव पडेल. म्हणून आपण मुलाखतीला जाताना नेमक्या कोणत्या कंपनीत जात आहोत याचा विचार करावा आणि तिथली चांगल्या ड्रेेसची कल्पना काय असेल याचा अंदाज करावा. प्रत्येक कंपन्यांचा ड्रेस कोड म्हणजे वेषभूषेविषयीची आचार संहिता वेगळी असतेे. काही कंपन्यांत पँट आणि हाफ शर्ट हा सर्वांना सक्तीचा केलेला ड्रेस असतो. तो सर्वांना सक्तीचाही असतो. त्यांचा रंगही ठरलेला असतो.

मुलाखतीला येणारांनी त्याच रंगाचा कपडा वापरावा अशी काही कंपनीची अपेक्षा नसते पण अशा कंपनीत मुलाखतीला जाताना पँट आणि त्यावर सोबर कलरचा हाफ शर्ट घातलेला बरा. अशा कंपनीत जाताना कोणी जीन्सची पॅँट आणि टी शर्ट घातला तर नक्कीच चालणार नाही. मुलाखतीला जाताना मुलांनी इन्फर्मल ड्रेस वापरावा. अनकॉमन ड्रेस वापरू नये. मुलींनीही जीन्स आणि टी शर्ट टाळावा. पंजाबी ड्रेस साधारणत: चालेल. कंपनीतली आपली निवड कपड्यावरून होत नाही हे खरे पण म्हणून कसलेही कपडे घालून जाऊ नये.

आपल्या मुलाखतीत कपड्याची परीक्षा होत नाही पण कपड्यांवरून आपले पहिले इम्प्रेशन पडत असते. ते चांगले पडले तर मुलाखत सुखाची आणि सुसंवादी वातावरणात होते पण उमेदवाराने खास लक्षात राहणारा असा भडक ड्रेस घातला तर त्याचा पहिला प्रभाव वाईट होतो. मुलाखतीत त्याचे प्रतिबिंब पडल्यावाचून रहात नाही. काही वेळा एखादा उमेदवार मुलाखतीत जाताना फारच चोेखंदळपणा करतो. तो मुलाखतीत पॅनेलसमोर बसतो तेव्हा सर्वांचे लक्ष त्याच्या कपड्यावरच खिळूून राहते. हेही वाईटच. कपडे कसलेही असले तरीही शक्यतो लेेदर शूज घातलेले असावेत.

Leave a Comment