आखडलेले स्नायू महाघातक

joint
कधी कधी आपले स्नायू आखडतात, कधी खांदा दुखतो तर कधी पिंढर्‍यात गोळे येतात. कधी पाठीत उसण भरते, तर कधी मान आखडते. अशा प्रकारच्या स्नायूंच्या दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्या घेऊन वेळ मारून नेतो. परंतु या दोन्हींमुळे आपल्या मेंदूवर काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते, शिवाय कायम आळशीपणा वाढण्याचीही शक्यता असते.

सातत्याने होणार्‍या अशा वेदनांनी माणूस थकून जातो, मानसिकदृष्ट्या तो खचून जातो आणि कोणतेही काम करण्यातला चपळपणा कमी होतो. मुळात काम करण्याची इच्छाच रहात नाही. प्रेरणा मंदावते आणि एकंदरीत माणूस निष्क्रीय व्हायला लागतो. कॅलिफोर्नियातल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक नील श्‍वार्टझ् यांनी या संबंधात संशोधन केले आहे.

या संबंधात उंदरांवर प्रयोग करण्यात आले तेव्हा भयंकर वेदना होणारे उंदीर समोर चॉकलेट असून सुद्धा ते चॉकलेट खाण्यासाठी पुढे धावण्यास प्रेरित झाले नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment