मोकळा श्वास घेण्यासाठी तिने उघडला विमानाचा आपातकालीन दरवाजा


विमानात प्रवाशांनी केलेली विचित्र कृत्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशा घटनांचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. असेच काहीसे विचित्र कृत्य चीनमधील एका महिलेने केले आहे. या महिलेने केलेल्या हरकतीमुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ बघून तुम्ही देखील हैराण व्हाल.

महिला चीनमधील वुहान ते लेन्जहोउ येथे जाणाऱ्या जियामेन एअरलाइन्समध्ये बसली होती. मात्र थोड्याच वेळात तिला एकदम भिती वाटू लागली. त्यामुळे महिलेने ताजी हवा घेण्यासाठी विमानाचा एमर्जन्सी दरवाजाचा उघडला. यावेळी महिलेच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाने तिला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्या महिलेने त्याचे काहीही ऐकले नाही.

महिलेने अचानाक एमर्जन्सी दरवाजा उघडल्याने विमानात बसलेले अन्य प्रवासी देखील घाबरले आणि त्यांनी त्वरित कॅबिन क्रूला माहिती दिला. त्यानंतर कॅबिन क्रू ने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

या घटनेनंतर महिलेला विमानातून उतरवत पोलिसांनी तिला अटक केली. या महिलेवर  काय कारवाई करण्यात आलेली आहे हे अद्याप समजू शकले नाही.

Leave a Comment