आयुष्मान भारत योजने अंतर्गत होणारा अनेक प्रकारच्या कॅन्सरवर उपचार

सरकारची महत्त्वकांक्षी आरोग्य योजना आयुष्मान भारतच्या अंतर्गत आता प्रत्येक प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) ने प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या उपचार पॅकेजच्या किंमतीमध्ये 10 ते 60 टक्क्यांनी वाढ केली आहे.

आयुष्मान भारत योजने अंतर्गत मोजक्याच कॅन्सरवर उपचार घेता येत असे. मात्र आता सरकारने स्तन, गर्भाशय, प्रोस्टेट, पोठ इत्यादी कॅन्सरचा देखील पॅकेजमध्ये समावेश केला आहे.

एनएचएनुसार, पॅकेजमध्ये येणाऱ्या 270 प्रकारच्या आजारांच्या उपचारांवरील किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तसेच, 237 नवीन उपचार पॅकेज देखील जोडण्यात आले आहेत. 469 पॅकेजच्या किंमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, 43 प्रकारच्या उपचारांना विविध भागात वाटण्यात आले आहे. याशिवाय 57 प्रकारच्या उपचारांच्या किंमती देखील कमी करण्यात आल्या आहेत.

एनएचएनुसार, आयुष्मान भारत योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या उपचार पॅकेजची संख्या 1393 वरून कमी करून 1076 करण्यात आली आहे. लाभार्थींना आधीच्या पॅकेजमध्ये 1083 सर्जिकल आणि 309 मेडिकल पॅकेज होते. एका पॅकेजमध्ये दुसऱ्या पॅकेजमध्ये येणाऱ्या आजारांवर उपचार केला जात असे, मात्र यात बदल होणार आहे.

प्राधिकरण सीईओ डॉ. इंद्रभूषण यांनी सांगितले की, पॅकेजमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे लाभार्थींवर कोणताही परिणाम होणार नाही. सरकारचा उद्देश केवळ कमी पॅकेजमध्ये अधिक उपचार देणे हा आहे. देशातील 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रूपयांचा आरोग्य विमा मिळत आहे.

याशिवाय प्रत्येक आजाराला एक विशिष्ट कोड देण्यासाठी इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ हेल्थ इन्टर्वेन्शन (आयसीएचआय) सिस्टमशी जोडण्यात आले आहे. ही सिस्टम डब्ल्यूएचओने उपचार प्रक्रियेला खास कोडशी जोडण्यासाठी बनवली आहे.

Leave a Comment