आता या कारणावरुन टेलिकॉम कंपन्यांमध्ये जुंपली

रिलायन्स जिओने आउटगोइंग कॉलच्या रिंगचा टाइम हा 20 सेंकदावरून वाढवून 25 सेंकद केला आहे. मात्र  तरी देखील भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या इतर कंपन्या हा वेळ कमीत कमी 30 सेंकद ठेवण्यात यावा या मागणीवर ठाम आहेत.

काही दिवसांपुर्वीच एअरटेलने टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ला पत्र लिहित म्हटले होते की, जर जिओने रिंगसाठी हाच वेळ कायम ठेवला तर इतर टेलिकॉम कंपन्या देखील रिंग टाइमिंग कमी करून 20 सेंकद करतील. एअरटेलने ट्रायला जिओचे रिंग टाइम वाढवण्यासाठी विनंती केली होती.

जिओने रिंग टाइमिंग वाढवून 25 सेंकद केला आहे. हा अंतरिम निर्णय असून, कंपनी ट्रायच्या गाइडलाइनची वाट पाहत आहे. एअरटेलने ट्रायला पत्र लिहित आरोप केला होता की, जिओ रिंग टाइमध्ये बदल करून इंटरकनेक्शन युजेज चार्जमध्ये छेडछाड करत आहे. एअरटेलने म्हटले आहे की, कमी वेळ रिंग अलर्टचा अर्थ म्हणजे मिस कॉल जास्त होणार आणि यामुळे जिओच्या नेटवर्कवर जास्त रिटर्न फोन कॉल होतील. मात्र जिओने जगभरात 15 ते 20 सेंकदच कॉल रिंग टाइमिंग असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणावर 6 सप्टेंबर रोजी ट्रायची बैठक झाली होती. या बैठकीत एअरटेल, व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्यांनी आउटगोइंग रिंग टाइमिंग 30 सेंकद ठेवण्यात यावे या गोष्टीचे समर्थन केले होते.

रिंग टाइम 25 सेंकद असावा. कोणालाही कॉलला उत्तर देण्यासाठी 20 सेंकद पुष्कळ आहेत, जास्त वेळ देणे हे स्पेक्ट्रम संसाधनांचे नुकसान आहे, असे जिओने म्हटले होते. ट्रायने या प्रकरणात कंसल्टेशन पेपर जारी करत सुचना मागवल्या आहेत.

Leave a Comment