भारतात लाँच झाला वनप्लसचा 7T मोबाईल आणि स्मार्ट टीव्ही


गुरूवारी भारतात बहुप्रतीक्षित वनप्लस 7T मोबाइल आणि वनप्लस टीव्ही लाँच करण्यात आला असून ३७ हजार ९९९ रुपये एवढी वनप्लसच्या स्मार्टफोनची किंमत असून ६९ हजार ९९० रुपये एवढी टीव्हीची किंमत आहे. वनप्लस7 चे अपग्रेडेड व्हर्जन वनप्लस7T हा मोबाईल असून काळानुसार यामध्ये अपडेड्स दिल्याचा दावा कंपनीने केला आहे.

अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी २८ सप्टेंबरपासून वनप्लस 7T ची विक्री सुरू होणार आहे. हा फोन फोटो आणि व्हिडिओचा वापर करणाऱ्यांना समोर ठेवून तयार करण्यात आला आहे. तीन रिअर कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. यात 48 मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर,117° अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2x टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.

कंपनीने वनप्लस 7T या स्मार्टफोनमध्ये दोन पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय ८ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज असा असून या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम २५६ स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये एवढी आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून ३,८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेल्या वनप्लस 7T मध्ये दमदार प्रोसेसर, कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनच्या टचस्क्रीनवर कंपनीने विशेष लक्ष दिले आहे.

त्याचबरोबर वनप्लस 7T स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ सोबत 90Hz स्क्रीन आणि 6.55 फुल एचडी प्लस फ्लूयड एलईडी देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सल अल्ट्रवाइड, 12 मेगापिक्सल टेलेफोटो असे फिचर्स देण्यात आले आहेत. त्या सोबतच क्वालक्वाम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे.

‘वनप्लस टीव्ही’मध्ये अँड्रॉईड टिव्ही बेस्ड कस्टम ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले असून हे 55 इंच वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हाय-एण्ड वेरियंट 4kHDR डिस्प्ले त्याचबरोबर 8 इनबिल्ड स्पिकर देण्यात आला आहे. यात गूगल प्ले स्टोअर देखील वापरता येणार आहे. याला Dolby Atmos आणि Dolby Vision चे सपोर्ट मिळणार आहे.

Leave a Comment