या सापाला देण्यात येणार उद्धव ठाकरेंच्या मुलाचे नाव

महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटामध्ये सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या प्रजातीचे नाव शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा लहान मुलगा तेजस ठाकरे यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. या प्रजातीच्या शोधामध्ये तेजस यांचे मोठे योगदान आहे.

पुण्यातील जैव विविधता संरक्षण फाउंडेशनचे संचालक वरद गिरि यांनी सांगितले की, सर्वसामान्य भाषेत सांगायचे तर ही प्रजाती कॅट स्नेक सापांच्या श्रेणीमध्ये येते. बोइगापासून या प्रजातीचा वंश आहे. या नवीन प्रजातीचे वर्णन करणारे संशोधन  बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीच्या पत्रकात प्रकाशित झाले आहे.

आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत याबाबत माहिती दिली.

गिरि यांनी सांगितले की, या वंशाचे साप संपुर्ण भारतात आढळतात. मात्र काही प्रजात्या केवळ पश्चिमी घाटातच सापडतात. या शोधात तेजस ठाकरे यांचे योगदान महत्त्वपुर्ण आहे त्यामुळे या प्रजातीचे ठाकरेज कॅट स्नॅक (वैज्ञानिक नाव बोइगा ठाकरेयी) ठेवण्यात आले आहे.

गिरि यांनी सांगितले की, तेजस ठाकरे यांनी ही प्रजाती 2015 मध्ये पहिल्यांदा पाहिली होती आणि यावर त्यांनी विस्ताराने अभ्यास केला. सातारा जिल्ह्यातील कोयना भागात ही प्रजाती सापडली.

 

 

Leave a Comment